मालेगाव च्या डोंगराईत घडली माणुसकीला काळीमा फासणारी घटना..!!
मालेगाव : ती फक्त ३.५ वर्षांची होती. अजून जगण्याची अक्षरंही नीट ओळखत नव्हती, पण आयुष्याने मात्र तिच्या नशिबात काळोखाची अशी रेष ओढली की मानवतेलाच लाज वाटावी.
एका निरागस देवदुतीवर जेव्हा त्या नराधमाने अमानुषपणे हात टाकला, तेव्हा मरत नव्हता फक्त तिचा श्वास… मरत होती समाजाची संवेदनशीलता, माणुसकीची ओळख, आणि प्रत्येक पालकाचा विश्वास.

अशा कृत्याला “पाप” म्हणणेही कमी आहे. तो मनुष्य नव्हताच—तो फक्त पाशवी प्रवृत्तीचा एक सावलीधारी राक्षस होता.
देवदूताच्या डोळ्यातील स्वप्ने हिरावणाऱ्याला शिक्षा फक्त न्यायालयात नाही, तर इतिहासाच्या प्रत्येक पानावर कायमचा काळा डाग म्हणून मिळायला हवी.
आज तिची आठवण आपल्याला फक्त तीव्र वेदना देत नाही…
तर एक जबाबदारीही देते. अशा नराधमांना कधीच समाजात जागा नसावी आणि प्रत्येक मुलगी सुरक्षित श्वास घेऊ शकेल असा दिवस घडेल का?
अपल्या मुलांचे भविष्य कोण सुरक्षित करणार…. आपण की न्यायव्यवस्था???
“निर्भीड समाचार” तर्फे या चिमुकलीस भावपूर्ण श्रद्धांजली..!!





