डॉ. रु. न. कूपर रुग्णालयास महानगरपालिका आयुक्त श्री. भूषण गगराणी यांची भेट ..!!
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विलेपार्ले स्थित डॉ. रु. न. कूपर रुग्णालयास महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी आज भेट दिली. रुग्णालयातील रुग्णसेवा अधिक प्रभावी व सुलभ करण्याच्या दृष्टीने श्री. गगराणी यांनी संबंधितांना विविध निर्देश दिले. वैद्यकीय सेवांच्या विस्ताराबाबत सविस्तर माहिती घेत नवीन सुविधा आणि आवश्यक सुधारणा यांचा त्यांनी आढावा घेतला.

स्वच्छता व कचरा व्यवस्थापनाबाबतही विशेष भर देत रुग्णालय परिसर अधिक स्वच्छ, सुरक्षित व रुग्णानुकूल करण्याचे निर्देश श्री. गगराणी यांनी दिले. तसेच रुग्ण, नातेवाईक, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधून सेवा व्यवस्थेची प्रत्यक्ष स्थिती देखील श्री. गगराणी यांनी जाणून घेतली.

उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) श्री. शरद उघडे, रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर, औषधवैद्यकशास्त्र विभागाच्या प्रमुख व पदव्युत्तर अधिष्ठाता डॉ. (श्रीमती) नीलम रेडेकर, वैद्यकीय अधीक्षक श्री. देव शेट्टी, डॉ. प्रवीण बांगर आदींसह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.




