बांग्लादेशी आणि रोहिंग्या विरोधात कारवाई करण्याची मंगलप्रभात लोढा यांची मागणी..!!


मुंबई : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांची घुसखोरी ही मुंबईच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय धोक्याची गोष्ट आहे. खोटे आधार कार्ड घेऊन हे घुसखोर आपल्या देशात येत आहेत. फेरीवाले, भाजीवाले, छोटे विक्रेते म्हणून आपल्यात वावरत आहेत आणि आपल्याच नागरिकांना धमकावत आहेत. आज जर यांच्यावर कारवाई केली गेली नाही तर हे घुसखोर संपूर्ण मुंबई काबीज करतील. भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गिरगाव मधील अशाच ८ घुसखोरांची खोटे आधार कार्ड जप्त केले आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी मंगलप्रभात लोढा यांनी पोलीस आयुक्त देवेन भारती यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

Advertisement

दरम्यान, मालवणी परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामाच्या विरोधा​तील कारवाईचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. यात​ नऊ हजार चौरस मीटर जागेवरील अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात बांग्लादेशी आणि रोहिंगे ​आढळून आले आहेत. कायदेशीर करवाई झाली असून सुद्धा पाडलेल्या झोपड्या पुन्हा पत्र्याच्या शेडच्या स्वरूपात उभ्या करण्याची तयारी येथे सुरु आहे. अधिक तपास करून पोलीस आयुक्तांनी तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी ​देखील यावेळी लोढा यांच्या कडून करण्यात आली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!