ज्ञानप्रभा कन्या शाळा, देगलूर जि. नांदेडच्या अस्मिता कांबळे चे स्पर्धात्मक परीक्षेत यश..!!
देगलूर, जि. नांदेड : ज्ञानप्रभा कन्या शाळा, देगलूर येथील विद्यार्थिनी कुमारी अस्मिता नागनाथ कांबळे हिने श्रेया इंटेलिजन्ट अकॅडमी सर्च परीक्षा २०२५ तर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता चौथीच्या स्पर्धात्मक परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. अकॅडमी तर्फे तिला गोल्ड मेडल आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे. तिच्या या यशाचे सर्व तालुका स्तरातून कौतुक होत आहे.
Advertisement
कुमारी अस्मिता नागनाथ कांबळे हिला ‘निर्भीड समाचार’ तर्फे पुढील शैक्षणिक वाटचालीस खूप खूप शुभेच्छा आणि तिचे हार्दिक अभिनंदन.





