परभणीच्या घटनेची मुंबईच्या मालाड मधे पुनरावृत्ती
मुंबई :
परभणी प्रकारणा नंतर, मालाडच्या आंबेडकर नगर म्हणजे बाबासाहेबांच्या नावाने असलेल्या नगरात बाबासाहेबांचा अपमान व प्रतिमेची विटंबना करण्यात आली. दि.०६/१२/२०२४ रोजी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त अभिवादन करण्यासाठी आंबेडकर नगर मालाड येथे बॅनर लावण्यात आले होते. सदर बॅनर अंजली शर्मा, ज्योति पटेल आणि गौतम विश्वकर्मा यांनी दि. ०७/०१/२०२५ रोजी जातीवादी भावनेने क्रूरपणे फाडला. बाबासाहेबांचा बॅनर फाडला म्हणून स्थानिक दलित नेते अविनाश शिंदे व नम्रता शिंदे यांनी विचारपूस केली असता त्यांच्याशी वाद झाला. त्याची तक्रार नोंदवण्यासाठी अविनाश शिंदे व नम्रता शिंदे काही कार्यकर्ते घेवून कुरार पोलिस स्टेशनला गेले असता कुरार पोलिसांनी बाबासाहेबांना सामान्य माणूस लेखून अदखलपात्र गुन्हा नोंद केला व आरोपीला मदत करून हे प्रकरण येथेच दाबन्यात आले.
एवढे मोठे प्रकरण घडवून सदर प्रकरणातील आरोपी अंजली शर्मा, ज्योती पटेल, गौतम विश्वकर्मा हे मोकाट फिरत होते. त्यातील गौतम विश्वकर्मा यांनी दि. ०८/०१/२०२५ रोजी सदरच्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी असलेला साक्षीदार मुस्ताक शेख याला गौतम विश्वकर्मा व त्याचे ५ ते ६ साथीदार यांनी रस्ता अडवून घेरून त्याला मारहाण केली.
सदरची बाब अविनाश शिंदे व नम्रता शिंदे यांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व पोलिसांना बोलावून गौतम याला अटक करून दिली, तरी देखील कुरार पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली नाही. सदरील घटनेचा अदखलपात्र गुन्हा नोंद करून आरोपींना सोडून दिले. NC दाखल करून आल्या नंतर अंजली शर्मा हिने मूस्ताक शेख यांना फोन करून कबुली दिली की सदर बॅनर काढण्यास सांगितले होते जर नाही काढले तर फाडून टाकू “क्योंकि उसमे हमारे दुश्मन का फोटो है” असे बोलून बाबासाहेबांना व दलित लोकांना दुश्मन म्हणून समजणाऱ्या महिलेचा पूर्ण कॉल रेकॉर्ड केला. तरी देखील पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही.
त्यानंतर सदर प्रकरण वाढत गेल्याने आरोपीने स्वतःच्या बचावा करीता दलित कार्यकर्ता अविनाश शिंदे विरुद्ध बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल केला आणि पोलिसांनी देखील तात्काळ गुन्हा नोंद केला. त्यामुळे अविनाश शिंदे यांना पोलिसांवर संशय येऊ लागला. त्यानंतर सदर बाब अविनाश शिंदे यांनी त्याचे मित्र वकील दीपक जगदेव यांना कळवली. तेव्हा बाबासाहेबांचा अपमान झाला हे कळताच वरिष्ठ वकील नितीन सातपुते व वकील दिपक जगदेव यांनी सदर बाब गांभीर्याने घेवून कुरार पोलिस ठान्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्याशी संपर्क साधून तात्काळ गुन्हा नोंद करण्यास सांगितले. तेव्हा दि. १५/०१/२०२५ रोजी अंजली शर्मा, ज्योति पटेल आणि गौतम विश्वकर्मा यांच्या विरुद्ध गु. क्रं. 58/2025 ऍक्ट्रोसिटीनुसार गुन्हा नोंद केला. त्यानंतर गुन्हा दाखल होवून देखील पोलीसांनी आरोपीला अटक न केल्यामूळे आरोपी मोकाट फिरत होते. तेव्हा आरोपीने फिर्यादीच्या नम्रता शिंदे यांच्या दारात जावून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तरी देखील आरोपीला अटक केली नाही.
सदर प्रकरणाचा मास्टर माईंड हा तेथील स्थानिक माजी नगरसेवक वैभव भरडकर आहे असा संशय अविनाश शिंदे यांनी व्यक्त केला आहे. राम भोईटे, आरोपी ज्योति पटेल हे वैभव भरडकर यांचे कार्यकर्ते आहेत.
तरी दलित नेते अविनाश शिंदे व त्यांच्या वकिलांनी सदर प्रकरणात वैभव भरडकर यांना आरोपी करून तात्काळ अटक करून सखोल चौकशी करण्यात यावे तसेच ज्योती, अंजली, गौतम विश्वकर्मा, वैभव भरडकर, राम भोईटे यांच्या मोबाईलचा CDR काढून योग्य ती कारवाई करावी. सदरील घटनेमुळे समस्त आंबेडकरी समाज नाराज असून ज्योती, अंजली, गौतम विश्वकर्मा, वैभव भरडकर, राम भोईटे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आहेत. बाबासाहेबांचा अपमान व विटंबना झाल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आरोपीला तात्काळ अटक नाही झाल्यास सहाय्यक पोलिस आयुक्त यांना आंदोलनाचा ईशारा देण्यात आला आहे.





