“स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई” अभियानांतर्गत क्रांतीनगर रिक्षा स्टॅन्ड एक नंबर वर..!!
मुंबई : क्रांती नगर रिक्शा स्टैंड आकुर्ली रोड, कांदिवली पूर्व या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृत बॅनर राजकीय पक्षांकडून लावण्यात येते आणि ते बॅनर लावण्या संदर्भात कोणत्याही प्रकारची कायदेशीर परवानगी घेण्यात येत नाही. यामुळे शहरी स्वच्छता धुळीस मिळत आहे याला जबाबदार कोण?

Advertisement

एकीकडे सरकार म्हणत आहे की “स्वच्छ मुंबई सुंदर मुंबई” आणि एकीकडे अशा बॅनरबाजी मुळे शहराची स्वच्छता दिवसेंदिवस खराब होत चालली आहे यावर प्रशासनाने कडक कारवाई करून बॅनरबाजी करणाऱ्या लोकांवर योग्य तो दंड वसूल करावा जेणेकरून अशाप्रकारे अनधिकृतपणे बॅनर लावणाऱ्या लोकांवर चाप बसेल आणि प्रशासनाला महसूल देखील मिळेल.




