कामाच्या ठिकाणी जातीयवाद प्रकरण: कल्याण (प.) मध्ये ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल..!!
कल्याण : कामाच्या ठिकाणी जातीय भेदभावामुळे पीडित झालेल्या एका महिलेला अखेर न्याय मिळाला. रिपब्लिकन सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मध्यरात्रीपर्यंत केलेल्या पाठपुराव्यामुळे बाजारपेठ पोलीस स्टेशन, कल्याण (पश्चिम) येथे ‘ॲट्रॉसिटी ऍक्ट’ (Atrocity Act) नुसार संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या महत्त्वाच्या लढ्यात रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी पीडित महिलेच्या बाजूने ठामपणे उभे राहिले. यामध्ये प्रामुख्याने रिपब्लिकन सेनेचे ठाणे जिल्हा प्रभारी मायाताई कांबळे , रिपब्लिकन कामगार सेना राज्य समन्वय भाई विक्रम खरे, हनुमंत वाघमारे साहेब, रिपब्लिकन सेना उल्हासनगर सचिव बाळकृष्ण शिंदे , रिपब्लिकन सेना महिला आघाडीच्या ज्येष्ठ नेत्या सुशिलाबाई डोळस, लताताई जगताप, उज्वलाताई ठोंबरे आणि रिपब्लिकन युवा सेना कल्याण जिल्हा अध्यक्ष प्रफुलजी साळवे यांचा सहभाग होता. त्यांच्या सहकार्याने काल रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम पूर्ण झाले. पिडीत महिलेने रिपब्लिकन सेनेचे आभार मानले.






