हनुमान नगर येथील पाल राजेंद्र हाईस्कूलच्या शिक्षकाला अल्पवयीन विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी अटक..!!
मुंबई : कांदिवली, हनुमान नगर येथील नामांकित पाल राजेंद्र शाळेमधे इयत्ता दहावीमधे शिकत असलेल्या एका अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या एका शिक्षकाला समता नगर पोलिसांनी अटक केली आहे. कुलदीप रामसुभाष पांडे असे या आरोपी शिक्षकाचे नाव आहे.

सदर आरोपीची बोरीवली येथील न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. प्राप्त माहिती नुसार सदर आरोपी शिक्षक पीडित विद्यार्थीनीला तिच्या मोबाईल वर अश्लील मैसेज करत होता. तसेच तिला अनैतिक प्रकारे तिच्या शरीराला हात लावण्याचा प्रयत्न करत असे. पीडित अल्पवयीन विद्यार्थीनीने घडलेल्या घटनेची माहिती आपल्या कुटुंबियांना दिली असता त्यांनी तातडीने समता नगर पोलिस चौकीला या घटनेसंदर्भात तक्रार दाखल केली. सदर घटनेची सखोल चौकशी समता नगर पोलिस प्रशासन करत आहे. घडलेल्या घटनेमुळे स्थानिक लोकांमधे संतापाची लाट उसळली आहे. पुनः एकदा विद्यार्थांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे.





