१९ वर्षीय तरुणाच्या आत्महत्ये प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल..!!


पुणे : पुणे येथील भोर या ठिकाणी राहणाऱ्या १९ वर्षीय बौद्धतरुण मयूर खुंटे यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून भोर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण यांच्यावर गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेतील कलम 108 (आत्महत्येस प्रवृत्त करणे), कलम 118(1) (मारहाण) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 अंतर्गत कलम 3(1)(r), 3(1)(s), 3(2)(v) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी पीडित कुटुंबीयांशी दूरध्वनीद्वारे संवाद साधत सांत्वन केले. कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी योग्य कायदेशीर मार्गाने लढा देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

Advertisement

या प्रकरणाला न्याय मिळावा आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी यासाठी पक्ष स्तरावरून पाठपुरावा सुरू आहे. ही घटना उजेडात आल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते आंदोलनात्मक भूमिकेत पुढे आले असून या प्रकरणाला गती मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे. कुटुंबीयांना भेट देऊन न्यायासाठी एकसंघ राहण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

यावेळी पुणे शहर अध्यक्ष ऍड. अरविंद तायडे, सातारा जिल्हा अध्यक्ष रामदास कांबळे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष मयूर गायकवाड, पुणे जिल्हा युवा उपाध्यक्ष मिलींद जगताप, प्रमोद भालेराव, अमर माने, विशाल शाक्य, डॉ. राजेश धिवार, महेंद्र सपकाळ, प्रकाश ओव्हाळ, अक्षय गायकवाड, सागर यादव, विनोद गायकवाड, बी. पी. सावळे, अरविंद कांबळे, प्रवीण बागुल, अमर शिंदे, प्रफुल जाधव, संदीप जाधव, सतीश गायकवाड, संतोष तांबे, अशोक गायकवाड आदी उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!