ज्येष्ठ सामजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचे दीर्घ आजाराने निधन..!!


पुणे : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. बाबा आढाव गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर पूना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना वयाच्या ९५व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.

बाबा आढाव यांचे सामाजिक कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी होते. त्यांनी कष्टकऱ्यांसाठी संपूर्ण आयुष्य वेचले. त्यांनी कष्टकरी मजुरांचे संघटन करून त्यांच्या हक्कासाठी लढा दिला. बाबा आढाव यांचा जन्म १ जून १९३० रोजी पुणे येथे झाला. त्यांचे संपूर्ण नाव बाबासाहेब पांडुरंग आढाव असे आहे. ते एक सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांनी असंघटित कामगारांसाठी आयुष्य वेचलं. तसेच त्यांनी साहित्य क्षेत्रातही योगदान दिले. त्यांनी रिक्षाचालक, हमाल, हातगाडी ओढणारे आणि इतर असंघटित क्षेत्रातील कामगारांना संघटित करून त्यांच्या हक्कांसाठी मोठा लढा दिला.

Advertisement

पुणे शहरात त्यांनी अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला आहे आणि त्यांना आदराने ‘पुणे शहराचे कुटुंब प्रमुख’ असेही म्हटले जाते. त्यांनी पुणे येथे ‘हमाल पंचायत’ आणि ‘असंघटित कामगार कर्मचारी महासंघ’ यांसारख्या संस्था स्थापन केल्या. अस्पृश्यता निवारण आणि सामाजिक समतेसाठी त्यांनी ‘एक गाव, एक पाणवठा’ ही चळवळ सुरू केली, जी अत्यंत गाजली. त्यांनी दलित वस्त्यांच्या सुधारणेसाठीही काम केले. बाबा आढाव यांनी सामाजिक विषयांवर आणि आपल्या चळवळींवर आधारित अनेक पुस्तके आणि लेख लिहिले आहेत.
बाबा आढाव यांनी सामाजिक चळवळी आणि कष्टकरी वर्गाचे जीवन दर्शवणारे महत्त्वपूर्ण लेखन केले आहे. त्यांच्या प्रमुख पुस्तकांमध्ये ‘एक गाव – एक पाणवठा’,त्यांचे आत्मचरित्रात्मक लेखन ‘मीच तो माणूस’ आणि ‘एक साधा माणूस’, ‘जगरहाटी’, ‘रक्ताचं नातं’, ‘असंघटित कामगार : काल, आज आणि उद्या’, ‘जातपंचायत : दाहक वास्तव’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : एक चिंतन’ ही काही महत्त्वाची पुस्तके लिहिली आहेत. या पुस्तकांनी वाचकांच्या मनावर खोल प्रभाव पाडला. बाबा आढाव यांच्या समाज कार्यात या पुस्तकांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता बाबा आढाव आपल्यात नाहीत. त्यांचे हे साहित्य आगामी पिढ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!