डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आढावा बैठक..!!
मुंबई : बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय यांच्याकडून महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित पूर्वतयारी साठी आढावा बैठक घेण्यात आली.
ही बैठक पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०५ (शिवाजी पार्क पोलीस ठाणे) यांच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट गाईड हॉल, वीर सावरकर मार्ग, शिवाजी पार्क, दादर (प), मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती.
Advertisement
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायांच्या सुरक्षित, सुव्यवस्थित आणि शिस्तबद्ध प्रवास सुनिश्चित करण्यासाठी घेतलेली ही महत्त्वपूर्ण समीक्षा बैठक अत्यंत सकारात्मक व सुयोजितपणे पार पडली.




