वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून कुरारचे पोलिस शिपाई संतोष कांगणे यांची आत्महत्या..!!
मुंबई :
कुरार पोलिस ठाणे मालाड पूर्व, मुंबई येथे कार्यरत असलेले वंजारी समाजातील पोलिस शिपाई संतोष कांगणे यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. कुरार पोलिस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संतोष कांगणे यांना खुपच त्रास दिला जेणेकरून त्यांना टोकाचे पाऊल उचलणे भाग पडले. या तरुण पोलिस शिपायाने त्याच्यावर झालेल्या अन्यायाची माहिती एका पत्रात लिहून आपले आयुष्य संपविले.
या पोलिस शिपाईला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक जनार्दन परबकर यांच्यावर कलम १०८, ३ (५) नुसार दखलपात्र गुन्हा नोंद करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते, ऍड. दीपक जगदेव यांनी केली आहे. तसेच संबंधित विषयाचे पत्र देखील माननीय मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलिस आयुक्त यांना ऍड. दीपक जगदेव यांनी लिहिले आहे. या पोलिस शिपायाच्या परिवारास शासनाने १ कोटी रुपये आणि त्याच्या परिवारातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्यात यावी अशीही मागणी ऍड.दीपक जगदेव यांनी केली आहे.
सदर प्रकरणात पुढील तपास सुरु आहे.





