सनी देओलविरोधात तक्रार दाखल


बॉलीवुड अभिनेता सनी देओलवर चित्रपट निर्माता सौरव गुप्ता यांनी अत्यंत गंभीर आरोप केले असून त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल  करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. २०१६ मधील प्रकरणामुळे आता सनी देओल अडचणीत सापडला आहे.

सनी देओलने चित्रपट करण्याच्या नावाखाली पैसे घेतले होते. त्यानंतरही तो चित्रपट लवकरच करू असं म्हणत पैसे घेत होता, पण त्याने आपल्याबरोबर कोणताही चित्रपट केला नाही, असा आरोप सौरव गुप्ताने केलाय.

काही मीडिया रिपोर्टनुसार, सौरव गुप्ताने २०१६ मधील प्रकरण आता उघड केलंय. या निर्मात्याने काही आरोपही केले आहेत. चित्रपट करण्याच्या नावाखाली पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Advertisement

आम्ही सनी देओलला १ कोटी रुपये ॲडव्हान्स दिले, पण चित्रपट सुरू करण्याऐवजी त्याने २०१७ मध्ये पोस्टर बॉयचं शूटिंग सुरू केलं. तो सतत पैसे मागत राहिला. आतापर्यंत आम्ही सनीच्या खात्यात २.५५ कोटी रुपये ट्रान्सफर केले आहेत. त्याने मला दुसऱ्या दिग्दर्शकालाही पैसे देण्यास सांगितलं. तसेच मला फिल्मिस्तान स्टुडिओ बुक करून एक कार्यकारी निर्माता घेण्यासही सांगितलं,” असा खुलासा या निर्मात्याने केला आहे.

इतकंच नाही तर, सनी देओलने २०१३ साली आपल्या कंपनीबरोबर बनावट करार केल्याचा आरोपही निर्माता सौरव गुप्ताने केला आहे. “१९९६ सालचा ‘अजय’ चित्रपटाचे हक्क परदेशात वितरणासाठी सनीने घेतले होते. त्याने याचे देखील बाकीचे पैसे दिले नाही.”, असा आरोपही या निर्मात्याने केलाय.

या आरोपांमुळे आता सनी देओल अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत. या प्रकरणी निर्मात्याने पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी चौकशीसाठी सनीला समन्स बजावले आहे. सनीने यावर अद्याप उत्तर दिलेलं नाही.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!