अमोल कीर्तिकर आणि भूषण पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितित अर्ज भरले
मुंबई : उत्तर मुंबई लोकसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार भूषण पाटील आणि उत्तर पश्चिम मतदार संघामधील महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तिकर या दोघांनी आज आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितित आपल्या निवडणुकीचे अर्ज वांद्रे येथील निवडणूक कार्यालयात जोरदार शक्ती प्रदर्शनासहित दाखल केले.
Advertisement
महाविकास आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या हातात मशाल आणि हाताच्या पंजाचे फलक होते. भूषण पाटील आणि अमोल कीर्तिकर यांनी मातोश्री वर जाऊन आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर महाविकास आघाडीद्वारे मोठी मिरवणूक काढण्यात आली आणि जोरदार घोषणा बाजी करण्यात आली.





