क्रांती नगर रिक्शा स्टैंड येथे अनाधिकृत रिक्शा आणि बाईक पार्किंग वर कारवाई..!!
मुंबई : क्रांती नगर रिक्शा स्टैंड या ठिकाणी अनाधिकृत रिक्शावाले आणि बाईक वाल्यांची पार्किंग आणि बाजूला महानगर पालिकेचे वर्ष भरापासून चालू असलेल्या कामामुळे ट्राफिक ची मोठी समस्या निर्माण होत असते. सकाळच्या वेळी नागरिकांना मोठ्या प्रमाणात या समस्येचा सामना करावा लागतो. नेहमी प्रमाणे ट्राफिक झाली असता समता नगर च्या वाहतूक ऑफिसर यांना फोन करून याबाबतची माहिती दिली असता त्यांनी दहा मिनीटांमधे त्या ठिकाणी ऑफिसर ला पाठवून करवाई करण्याचे आदेश दिले.


काही लोक त्यांच्या कामामधे अडथळा निर्माण करत होते पण त्यांनी कायद्यानुसार कारवाई करणार असल्याचे सांगितले. त्यानुसार ऑफिसर यांनी कारवाई करून ट्राफिक सुरळीत करून मार्ग मोकळा केला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. ही समस्या जर अशीच सुरु राहिली तर निर्भीड समाचार यविरोधात नेहमी लढा सुरुच ठेवणार. तसेच या कारवाई विरोधात विभागातील अनेक नागरिकांनी देखील सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे देखील आभार.





