“भाजपची ब्रँड व्हॅल्यू अजित पवारांमुळे कमी”
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून भाजपला सर्वात मोठा धक्का बसल्यामुळे भाजपने विधानसभा निवडणुकीकडे लक्ष केंद्रित केले आहे. अशातच आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रात (Organiser) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबतची युती हे महाराष्ट्रातील भाजपच्या लोकसभा निवडणुकीत पराभवाचे एक कारण असल्याचे सांगितले आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तोडून पवारांच्या नेतृत्वाखालील गटाशी युती करण्याच्या भाजप नेतृत्वाच्या निर्णयावर आरएसएस खूश नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. याशिवाय “आरएसएस-भाजपचे कार्यकर्ते पवारविरोधी फळीवर तयार झाले आहेत. ते अजित पवार विरोधी आहेत. ते सिंचन आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यांशी जोडले गेले आहेत. पण पवारविरोधी कथनाने बळ घेतले आहे.
“लोकसभा निवडणुकीत आरएसएस-भाजपचे कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी प्रचार करण्यास तयार नसल्याचे दिसून आले. परिणामी भाजपची संख्या २०१९ मधील २३ वरून २०२४ मध्ये ९ वर आली आहे. यासंदर्भात आरएसएस कार्यकर्ता रतन शारदा म्हणाले की, भाजपने अजित पवार सोबत युती केल्याने “भाजपची ब्रँड व्हॅल्यू अजित पवारांमुळे कमी” झाली.
संघाला दहशतवादी संघटना म्हणणाऱ्या काँग्रेस नेत्याला भाजप मध्ये प्रवेश दिल्याने स्वयंसेवकांची मने दुखावली आहेत. महाराष्ट्रात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडे पुरेसे बहुमत असताना अजित पवारांना सोबत का घेतले असेही मुखपत्रात म्हटलं आहे.
तसेच या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत “जर आमचा पक्ष अजित पवारला डावलून विधानसभेच्या निवडणुकीत शिंदे यांच्या बरोबरीने पुढे गेला तर भाजपने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा वापर केला आणि नंतर त्यांना फेकून दिल्याचे दिसून येईल. त्यामुळे पुन्हा एकदा वापरा आणि फेकणे हे धोरणही बूमरँग होऊ शकते.





