उज्वल निकम यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली
मुंबई : उज्वल निकम यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली : उत्तर मध्य मुंबईतील महायुतीचे उमेदवार उज्वल निकम यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या राहत्या घरी म्हणजेच शिवतीर्थावर भेट घेतली.
Advertisement
यावेळी मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आशीष शेलार देखील उपस्थित होते. राज ठाकरे यांनी महायुतिला पाठिंबा जाहीर केला आहे.
उज्वल निकम हे अनेक मान्यवर लोकांना भेटत आहेत. राज ठाकरे ,आशिष शेलार आणि उज्वल निकम यांच्या मधे प्रचारा संदर्भात सुमारे तास भर चर्चा करण्यात आली.





