महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक- २०२५ करिता प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी कार्यक्रमाच्या अनुषंगाने आढावा बैठक..!!


मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक- २०२५ करिता प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी कार्यक्रमाच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीबाबत महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. भूषण गगराणी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज बैठक पार पडली. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी, विशेष कार्य अधिकारी (निवडणूक) श्री. विजय बालमवार, सह आयुक्त (करनिर्धारण व संकलन) श्री. विश्वास शंकरवार, कोकण विभागाच्या अपर आयुक्त (सामान्य प्रशासन) श्रीमती फरोघ मुकादम, महानगरपालिकेचे सहायक आयुक्त (करनिर्धारण व संकलन) डॉ. गजानन बेल्लाळे, जिल्हा उपनिवडणूक अधिकारी (मुंबई उपनगरे) श्रीमती अर्चना कदम व उपनिवडणूक अधिकारी (मुंबई शहर) श्री. शामसुंदर सुरवसे यांची यावेळी उपस्थिती होती.

Advertisement

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सह आयुक्त, परिमंडळ उप आयुक्त, सर्व प्रशासकीय विभागांचे सहायक आयुक्त, निवडणूक निर्णय अधिकारी, प्रारुप मतदार यादी हरकत व सूचना कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.

प्रभाग प्रारुप मतदार यादीतील दुबार (समान) नावांबाबत करावयाच्या उपाययोजनांबाबत यावेळी माहिती देण्यात आली. तर, विभाग (वॉर्ड) स्तरावर स्थापित करण्यात आलेल्या मदत केंद्रात (हेल्प डेस्क) दुबार मतदारांची यादी उपलब्ध करुन देणे, दुबार मतदार नावांबाबत घरोघरी (डोअर टू डोअर) सर्वेक्षण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय येथील पेंग्विन सभागृहात ही बैठक संपन्न झाली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!