महागाईचा “जोर का झटका धीरे से”


लोकसभा निवडणुकीच्या निकालादरम्यान देशातील जनता महागाईने होरपळली आहे. अमूल दुधाच्या विविध प्रकारांच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. दुधाचे वाढलेले दर सोमवार ३ जून रोजी पासून लागू होणार आहेत. त्यामुळे सामान्य माणसांना दूध खरेदी करण्यासाठी २ रुपये अधिक द्यावे लागणार आहेत.

Advertisement

अमूलने गोल्डसह सर्व ब्रँडच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन (GCMMF) ने सोमवार, ३ जूनपासून नवीन दुधाचे दर लागू करण्याची घोषणा केली आहे. अमूलनंतर मदर डेअरी आणि इतर कंपन्याही दुधाचे दर वाढवू शकतात. नव्या किमतींनंतर अमूल गोल्डच्या एक लिटर दुधाच्या पिशवीला २ रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. आता एक लिटर अमूल गोल्ड दुधासाठी तुम्हाला ६६ रुपये मोजावे लागणार आहेत.

गुजरात सहकारी दूध विपणन महासंघाने वाढीव भाव जाहीर केले आहेत. २ रुपये प्रति लिटर वाढ म्हणजे एमआरपी 3-4% वाढेल, जी सरासरी अन्न महागाईपेक्षा खूपच कमी आहे. अमूलने फेब्रुवारी २०२३ पासून गुजरात वगळता देशातील प्रमुख बाजारपेठांमध्ये ताज्या पाऊच दुधाच्या किमतीत वाढ केलेली नाही.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!