अनुदत्त विद्यालय, कांदिवली पूर्व येथील “माझी शाळा माजी विद्यार्थी संघ” तर्फे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप..!!
मुंबई : अनुदत्त विद्यालय, क्रांती नगर, कांदिवली पूर्व येथील “माझी शाळा माजी विद्यार्थी संघ” तर्फे सामाजिक बांधिलकी जोपासत जिल्हा परिषद शाळा, नंबरवाडी (बोराडपाडा, बदलापूर) येथे शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम राबवण्यात आला.
बोराडपाडा-कुडेरान रोडवरील या शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, वाचन साहित्य अशा विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम संघाच्या सर्व माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पडला.
ग्रुपच्या माध्यमातून सर्वांना निवेदन करण्यात आले होते, त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभून उपक्रम यशस्वी झाला. सदर उपक्रमामुळे गरजू विद्यार्थ्यांना शालेय जीवनात प्रेरणा व शिकण्याची उमेद मिळणार आहे.
सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणाऱ्या “माझी शाळा माजी विद्यार्थी” संघाला ‘निर्भीड समाचार’ चा सलाम..!!






