मुंबई महानगर पालिकेच्या भाभा रुग्णालयात एका रुग्ण महिलेने नर्सला केली मारहाण
मुंबई: रुग्णाची नर्सला मारहाण : मुंबई महानगर पालिकेच्या भाभा रुग्णालयात एका रुग्ण महिलेने नर्सला मारहाण करण्याची घटना समोर आली आहे.
संबंधित नर्स ने रुग्णाच्या नातेवाईकांना बाहेर जाण्यास सांगितले असता सदर रुग्णाने नर्स ला मारहाण केली. रुग्ण महिला आणि त्यांच्या नातेवाईकांकडून नर्सला अपशब्द वापरण्यात आले. याविरोधात कर्मचारी संघटनेने कामबंद आंदोलन करण्याचा पवित्रा हाती घेतला आहे.
Advertisement
कर्मचारी संघटनेने सांगितले की वार्डमधे साफसफाई आणि इंजेक्शन द्यायची वेळ झाली होती म्हणून त्यांना बाहेर जाण्यास सांगण्यात आले. पण त्या लोकांनी नर्सला अपशब्द वापरले. त्यामुळे जोपर्यंत रुग्णावर कार्यवाही होणार नाही तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरुच राहणार असल्याचे सांगण्यात आले.





