मनसे पदाधिकाऱ्याच्या मुलाचा दारू पिऊन धिंगाणा-अर्धनग्न अवस्थेत इन्फ्लुएन्सर राजश्री मोरेला शिवीगाळ..!!


मुंबई : मुंबईतल्या अंधेरी भागात रविवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली. मराठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून ओळख असलेल्या राजश्री मोरेने मनसे नेते जावेद शेख यांचा मुलगा राहिल शेख याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तिच्या गाडीचा झालेला अपघात, त्यानंतर झालेली धक्कादायक वादावादी, अर्धनग्न अवस्थेत दिलेल्या धमक्या आणि शिवीगाळ यामुळे सोशल मीडियावर प्रचंड खळबळ उडाली आहे.

राजश्री मोरेने स्वतः हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करून संपूर्ण प्रकार उघडकीस आणला. त्या व्हिडीओत राहिल शेख हा आक्रमकपणे शिवीगाळ करताना, “मी जावेद शेखचा मुलगा आहे, पैसे घे आणि जा”, असे धमकावताना दिसतो. तो अर्धनग्न अवस्थेत असून, मद्यधुंद अवस्थेत असल्याचे स्पष्ट दिसते.

Advertisement

घटनेनंतर राजश्रीने पोलिसांत तक्रार दाखल केली असून, एफआयआरची प्रतही तिने इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. तिच्या म्हणण्यानुसार, राहिल दारूच्या नशेत गाडी चालवत होता आणि त्यानंतर तिच्या गाडीला धडक दिली. यानंतर त्याने केवळ तिला नाही तर घटनास्थळी असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांनाही अपमानास्पद वागणूक दिली. तिने यासंदर्भात जाहीरपणे आरोप करताना सांगितले की, एफआयआर दाखल झाल्यानंतर तिला मनसे कार्यकर्त्यांकडून सातत्याने धमक्या मिळत आहेत. हा प्रकार गंभीर असून, यामागे राजकीय दबाव असल्याचं संकेत तिने दिले आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!