शिवसेना (शिंदे गट) दिंडोशी विधानसभा शाखा क्र. ३९ तर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा..!!
मुंबई : शिवसेना (शिंदे गट) शाखा क्र. ३९ च्या वतीने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा काल दिनांक १०/०८/२०२५ रोजी मोठ्या जल्लोषात पार पडला. सदर कार्यक्रमाचे आयोजन शाखा क्र. ३९ च्या माजी नगरसेविका श्रीमती विनया विष्णू सावंत यांच्याद्वारे करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य प्रदुषण मंडळाचे अध्यक्ष श्री. सिद्धेश दादा कदम, खासदार रवींद्र वायकर यांच्या धर्मपत्नी श्रीमती मनीषाताई वायकर, दिंडोशी-गोरेगाव विधानसभा समन्वयक श्री. विष्णू सावंत, युवासेना कार्यकारणी सदस्य रुपेश कदम, युवासेना दिंडोशी-गोरेगाव लोकसभा अध्यक्ष श्रीकांत यादव, शाखा क्र. ३९ चे उपशाखाप्रमुख नितेश अंबुरे, भाजपा उत्तर पश्चिम मुंबई जिल्हा सचिव इंद्रजित उर्फ पप्पू सिंह, भाजपा वार्ड क्र. ३९ चे वार्ड अध्यक्ष सौरव सिंह तसेच महायुतीचे बरेच पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते दहावी आणि बारावी मधे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले आणि त्यांना पुढील शैक्षणिक जीवनासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.




