‘कोरो इंडिया संस्था आणि युवा मंथन’ द्वारे फुटबॉल सामन्याचे आयोजन..!!
मुंबई : विजय उत्तमबाई कांबळे
प्रेस नोट: फुटबॉल टूर्नामेंट

हरवलेले जीवन …
चला तर मग पुन्हा एकदा , रोजच्या धावपळीत शाळा आणि कॉलेज च्या अभ्यास आणि परीक्षा तणाव मधून मेंदूला म्हणजेच आपल्या मानसिक आरोग्याला ब्रेक देऊन फ्रेश करणे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे, त्यामुळे आपल्या संपूर्ण शरीरातील भागांना ही सकारात्मक उर्जा मिळते, यामुळे युवा मंथनच्या माध्यमातून युवांसाठी ही संधी आपण फुटबॉल Match च्या द्वारे तयार करत आहोत. चला तर मग मानसिकरित्या स्वत:च्या आरोग्याला राखण्यासाठी वेळ देऊया आणि आपले आरोग्य उत्तम ठेऊया.
सध्याच्या सोशल मिडियाच्या वातावरणामुळे हळू हळू मैदानी खेळ हे कमी होत चालले आहे , शरीराला व्यायाम नसल्यामुळे युवतीं मध्येही मासिक पाळीची समस्या, खूप कमी वया मध्ये हृदयविकार घटना, घडताना दिसत आहे . याचा परिणाम युवा आणि महिलांवर अधिक होताना दिसत आहे. यातूनच मानसिक आरोग्याचे प्रश्न देखील वेगवेगळ्या घटनांमधून पुढे आले आहेत.
खूप कमी वयात युवा आणि महिला, पुरुष आता वेगवेगळ्या आजाराच्या समस्यांना घेऊन आपले जीवन जगतानाचा मुद्दा पुढे येताना दिसत आहे , याचे कारण मुख्यतः म्हणून पुढे आले आहे कि जो व्यायाम युवाने या किशोरवयीन वयात करायला हवा तसा तो आताचा सोशल मिडिया आणि मोबाईल जगात होताना दिसत नाही. चिडचिडेपणा, शरीराची वाढ न होणे, भूक न लागणे, मानसिक तणाव, आत्महत्याचा विचार डोक्यात येणे अश्या समस्यांना युवा, महिला, पुरुष, बालक हे घटक आपल्याला सामोरे जाताना दिसत आहे. या समस्यावर मार्ग काढण्यासाठी वस्तीत अश्या प्रकारे कार्यक्रम करून अशी जागा उपलब्ध होण्यासाठी मदत होईल .
तसेच समाजात मैदानी खेळांना घेऊन अनेक सामाजिक नियम समाजात तयार केले आहे, या फुटबाल Match मधून आपण या विषयी या नियमाला ब्रेक करायचा प्रयत्न करणार आहोत. मुलींनी मैदानी खेळ खेळायला हे जास्त आणि सातत्य ठेवण्याच्या देखील सराव ठेवू . खेळाच्या प्रकारामध्ये ही कोणते खेळ कोण खेळू शकतो हे चित्र आपण सोशल मिडीयावर बघत असतोच त्यातही जात, जेंडर आणि धर्माचा मुद्दा आहेच. पण जिद्द आणि सराव या दोनच गोष्टी या महत्वाचा आहेत, हे आपण या फुटबाल match मधून घडवून आणणार आहे . आणि युवा मध्ये हा आत्मविश्वास तयार करणार आहोत.
Match स्वरूप :
दिनांक १७/०४/२०२५ , गुरुवार
रोजी चेंबूर मधील श्री नारायण गुरु कॉलेज मधील फुटबाल ग्राउंड मध्ये होणार आहे . वेळ हि ३ ते रात्री ९ वाजे पर्यंत असणार . या मॅचमध्ये मुंबई शहरातील विविध वस्त्यांमधील एकूणच २३ टीम सहभागी होणार .
तसेच मॅच चे रेफ्री आणि कोचिंग हे ऑस्कर फाउंडेशन चे यंग लीडर करतील . प्रत्येक टीम ला १० मीन match खेळण्यासाठी दिले जाईल. आणि विनर नंबर हे ३ घोषित केले जाईल. ट्रॉफी वाटपाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे येतील. ज्या आपल्या विभागात युवा आहे जे राष्ट्रीय पातळीवर ते खेळत आहे अशांनाआमंत्रित करणे. त्यांचे युवा बद्दलचे मनोगत आणि सहभागी युवाचे मनोगत असा एकूण कार्यक्रम असेल .
आयोजक : कोरो इंडिया संस्था आणि युवा मंथन





