“पिंजरा” सिनेमातील अभिनेत्री संध्या शांताराम काळाच्या पडद्याआड ..!!


मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेला सिनेमा “पिंजरा” मध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९७ व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे. काल संध्याकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून संध्या यांना श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत.

Advertisement

ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम या व्ही शांताराम यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. त्यांनी मराठीसह हिंदी सिनेमांमध्येही स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता त्यांच्या निधनाची बातमी समोर येत आहे. शनिवारी सकाळी साडे दहा वाजता परळ येथील राजकमल स्टूडिमधून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली होती. त्यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क येथील वैकुंठधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x