“निर्भीड समाचार” आवाज सर्वसामान्य जनतेचा…वर्धापन दिन विशेष..!!


मुंबई : नमस्कार वाचकहो, आज मला आपणांस सांगावयास अतिशय आनंद होत आहे की आज आपल्या “निर्भीड समाचार” या न्यूज पोर्टलचा प्रथम वर्धापन दिन आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे प्रथम वर्ष यशस्वीरीत्या पार पडले त्याबद्दल सर्वप्रथम आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार..!!

भारतीय लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे मीडिया. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मीडियाचा मोठा सहभाग होता. कारण लोकांपर्यंत आपले विचार प्रभावीपणे पोहोचविण्याचे हे प्रभावी माध्यम आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात प्रिंट मीडिया म्हणजेच वर्तमान पत्राचा वापर जनजागृती करण्यासाठी केला जात असे. जसजसा काळ बदलत गेला तसे मीडियाचे स्वरूप अधिक व्यापक बनले. यामध्ये इलेकट्रोनिक मीडिया आणि सोशल मीडियाचा वापर वाढू लागला. सोशल मीडिया मध्ये वॉट्सअप, फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम यांसारख्या माध्यमांचा प्रभावीपणे वापर होऊ लागला. यामध्ये अजून एका सोशल मीडियाची भर पडली ती म्हणजे “न्यूज पोर्टल”ची. न्यूज पोर्टल च्या माध्यमातून देखील पत्रकारांना लोकांच्या समस्या असो व इतर कोणत्याही प्रकारचे जनजागृती विषयक कार्य असो ते प्रभावीपणे करता येतात.

‘निर्भीड समाचार’ या आपल्या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून गेल्या एक वर्षांमध्ये लोकांना दैनंदिन जीवनात होणाऱ्या लोकांच्या दैनंदिन जीवनात निर्माण होणाऱ्या समस्यांना जाणून घेऊन निर्भीडपणे शासन दरबारी कायदेशीर लढा लढून न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. “आवाज सर्वसामान्य जनतेचा” हे आमच्या ‘निर्भीड समाचार’ या न्यूज पोर्टलचे घोषवाक्य आहे. या घोषवाक्याप्रमाणेच आम्ही आतापर्यंत कार्य करत आलो आहोत आणि यापुढेही करत राहू.

Advertisement

कोणतेही कार्य हे एकट्याचे काम नाही. त्यासाठी समाजातील लोकांची गरज लागतेच. आमच्या न्यूज पोर्टलचे कार्यकारी संपादक मा. श्री. विजय उत्तमबाई कांबळे यांनी कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता अगदी प्रामाणिकपणे कार्य करत आपली मोलाची भूमिका न्यूज पोर्टल साठी पार पाडली, यासाठी मी त्यांचा शतशः आभारी आहे. तसेच माझे शालेय जीवनातील सहकारी आणि मित्र यांचा देखील मोठ्या प्रमाणात सहयोग लाभला यासाठी मी त्यांचा आभारी आहे. तसेच शिवसेना (शिंदे गट) मधील दिंडोशी-गोरेगाव विधानसभा समन्वयक मा. श्री विष्णू सावंत साहेब आणि दिंडोशी विधानसभा (शिंदे गट) उपविभाग प्रमुख आणि आमचे मित्र मा. श्री नितीन स्वामी यांचे देखील वेळोवेळी सहकार्य लाभले यासाठी मी त्यांचा देखील आभारी आहे. दिंडोशी विधानसभा (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मधील उपशाखाप्रमुख आमचे मित्र मा. श्री. दीपक कदम आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रोजगार विभाग संघटक आणि आमचे मित्र मा. श्री. अभिजित पाळेकर यांचे देखील वेळोवेळी सहकार्य लाभले यासाठी मी त्यांचा देखील आभारी आहे. तसेच भारतमाता विद्यालयाचे संस्थापक/अध्यक्ष मा. श्री. सम्रतराव कांबळे सर तसेच शाळेचे ट्रस्टी आणि आमचे मित्र मा. श्री. सुचित कांबळे यांचे देखील वेळोवेळी सहकार्य लाभले यासाठी मी त्यांचा देखील आभारी आहे. कायदेशीर सल्ला देणारे आमचे मित्र मा. श्री. ऍड. दीपक जगदेव यांचा देखील आभारी आहे.

शेवटी एकच सांगेन की यापुढेही आमचे कार्य हे लोककल्याणासाठी “निर्भीडपणे” करत राहू.

आपलाच स्नेही आणि मुख्य संपादक
किसन राम गायकवाड


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!