*वैभव भरडकर यांची दलित युवानेता अविनाश शिंदेला गुन्हा मागे घे नाहीतर सहपरिवार जिवंत जाळून टाकुन जीवे मारण्याची धमकी..!!
मुंबई : मालाड आंबेडकर नगर मालाड येथील घटना
दि. 07/01/2025 रोजी वैभव भरडकर मार्फत काही समाजकंठाकाने बाबासाहेबांची बॅनरची विटंबना केली होती. त्या अनुषंगाने अविनाश शिंदे या सामाजिक कार्यकर्तेनी त्याचा विरोध करून 3 लोकांविरुद्ध ऍक्ट्रोसिटी नुसार गुन्हा नोंद केला. अद्याप एक आरोपी फरार आहे आणि 2 आरोपी जेलबंद आहेत. त्यानंतर आरोपीच्या पतीने अविनाश शिंदे याचे तुकडे करणार असे धमाकावून शिवीगाळ केली त्यांची सुद्धा तक्रार कुरार पोलीस ठाणे मध्ये नोंद आहे. या संपूर्ण प्रकरणात मुख्य तसेच मास्टर माईंड वैभव भरडकर यांची वारंवार आरोपी करण्याची तसेच CDR काढून सखोल चौकशी करण्याची मागणी केल्याने दि. 18/05/2025 वैभव भरडकर व त्यांच्या साथीदाराने फिर्यादी अविनाश शिंदे यांना धमकावून गुन्हा मागे घे नाही जिवंत सहपरिवार जाळून टाकू अशी जीवे मारण्याची धमकी दिली तसेच अविनाश शिंदे याला फोन करून सुद्धा काय विचार केला. कोणालाही सोडणार नाही अशी धमकी देवून जातीवाचक शिवीगाळ केली. वारंवार दलित समाजातील फिर्यादी याला गुंड लोकांकडून जीवे मारण्याची धमकी येत आहे. सदरची लेखी तक्रार कुरार पोलीस ठाणे येथे दिली आहे.
संपूर्ण भीम सैनिक, आंबेडकरी समाज अविनाश शिंदे या तरुणांच्या पाठीमागे आहे. त्यांच्या केसाला जरी धक्का दिला तर याला जबाबदार, पोलीस ACP, DCP, तसेच कुरार पोलीस ठाणे तसेच कलेक्टर हे जबाबदार असणार.. तसेच अविनाश शिंदेच्या परिवाराला पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी केली आहे.




