हास्य सम्राट ‘अंकुर वाढवे’ यांनी पत्नीच्या वाढदिवसानिमित्त घेतला मोठा निर्णय…!!
मुंबई : हास्य सम्राट अवलिया कलाकार अंकुर वाढवे आणि त्यांच्या पत्नी निकिता वाढवे यांनी वाढदिवसाच्या दिवशी मरणोत्तर अवयव दान आणि देहदान करण्याचा निर्णय घेतला.
हे खूपच ग्रेट काम आहे “अंकुर वाढवे आणि त्यांच्या पत्नी निकिता वाढवे यांनी जो निर्णय घेतला त्याचा आम्हाला खुप अभिमान वाटतो. कारण जिवंत असे पर्यंत आपले विचार, आपलं तत्वज्ञान, आपलं शरीर हे मानवीय कल्याणकारी समाज घडावा यासाठी जमेल तस आपण काम करतच राहतो. पण अंकुर वाढवे हे लोकांना हसवण्याचं, त्यांच्या जीवनात आनंद भरण्याचं काम त्यांच्या कलेमधून तर करत आलेच आहेत आणि अजून पुढेही करत राहतीलच.

परंतु “काम ऐसे करावे, जे मरूनी जगावे…!! या उक्ती प्रमाणे “नुसतं जळून राख होण्यापरी, अवयव रुपी उरावे…!! याचं उत्तम उदाहरण आहेत. एकविसाव्या शतकातले एक तरुण तडफदार असे नाट्य, सिने कलाकार म्हणून ते मरणोत्तर सुद्धा सगळ्यांच्या हृदयावर राज्य करत राहणारच होते. परंतु नुसतं केलेल्या कामावरच न जगता ते शरीरातील अवयव जळल्यानंतर राखच होणार तर का नको मरणोत्तर सुद्धा लोकांच्या कामी का नको यावं म्हणूनच हा निर्णय घेतला असावा.
तुमचे डोळे नेमके तुम्ही नसताना सुद्धा तुझे नाटकं, तुझे सिनेमे, ऑनलाईन स्वरूपात बघतील आणि आनंदी होतील. तुझं हृदय सुद्धा कोणाच्या तरी छातीत धडकत राहील. त्या व्यक्ती जे तुझे अवयव वापरतील त्या सर्व व्यक्ती आयुष्यात खचलेले असतील आणि हारलेलं समजून निराश झाले असतील, तर ते तुमचे अवयव मिळाल्यानंतर सर्वाना आनंदी ठेवण्याचा, आशावादी जगण्याचा, पुढे जाण्याच्या, कधीही आयुष्यात हार न माणण्याच्या वाटेवरचे प्रवासी होतील आणि खरंच वाटतं तेही अगदी तूझ्या सारखे जगायला लागतील.

याच आशेसह तुमच्या निर्णयाचं मनपूर्वक अभिनंदन आणि निकिता वहिनींना माझ्या आणि ‘निर्भीड समाचार’
तर्फे पुनश्चः वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा…!!





