निकालाला कोर्टात आव्हान देणार – अमोल कीर्तिकर
यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात अत्यंत मोठ्या फरकाने आघाडी-पिछाडी पाहायला मिळाली आहे. तर काही ठिकाणी अत्यंत चुरशीची लढत देखील पाहायला मिळाली आहे.
उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघातून अमोल गजानन कीर्तिकर (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि रविंद्र वायकर (शिवसेना) पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या मतदारसंघात सुरुवातीला अमोल कीर्तिकर यांना विजयी घोषित करण्यात आले. परंतु शिवसेनेचे रविंद्र वायकर यांनी फेरमतमोजणी करावयास सांगितले. फेरमतमोजणी नंतर रविंद्र वायकर यांना विजयी म्हणून घोषित करण्यात आले. अमोल गजानन कीर्तिकर यांना एकूण (४,५२,५९६) इतकी मते मिळाली तर रविंद्र वायकर यांना एकूण (४,५२,६४४) इतकी मते मिळाली. फेरमतमोजणी नंतर रविंद्र वायकर यांचा अवघ्या ४८ मतांनी विजय झाला आहे.
परंतु अमोल कीर्तिकर यांनी मतमोजणी प्रक्रियेचे व्हिडिओ फुटेज देण्याची विनंती आयोगाला केली आहे. उत्तर पश्चिम मुंबईतून कीर्तिकरांचा ४८ मतांनी पराभव झाल्यामुळे त्यांनी फुटेज चेक करून निकालाला कोर्टात आव्हान देणार असल्याची माहिती दिली आहे.





