“Indigo फ्लाइट ६ए५१८१” वर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ऑन बोर्ड अभिवादन..!!


मुंबई : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त इंडिगो फ्लाइट 6E5181 वर एक आगळावेगळा क्षण अनुभवण्यात आला. समता सैनिक दलाचा गणवेश परिधान करून मुंबईहून इंदोरकडे प्रवास करणारे माजी सीमाशुल्क अधिकारी श्री. मदन पवार यांनी बाबासाहेबांच्या जन्मभूमी असलेल्या मिलिटरी कॅम्प, महू येथे अभिवादन करण्यासाठी हजेरी लावली.

इंदोर विमानतळावर पोहोचल्यावर इंडिगोच्या केबिन क्रूने त्यांच्या गणवेशाबद्दल कुतूहलाने चौकशी केली. त्यावर मदन पवार यांनी सांगितले की, “पूर्वी मी कस्टम अधिकारी होतो, आता मी समता सैनिक दलाचा एक सक्रिय सैनिक म्हणून बाबासाहेबांच्या मिशनमध्ये कार्यरत आहे. आज मी महू येथे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलो आहे.”

Advertisement

ही माहिती कॅप्टन नम्रता व को-पायलट आलोक यांच्यापर्यंत पोहोचताच, दोघेही कॉकपिटमधून बाहेर आले आणि त्यांनी मदन पवार यांचे स्वागत केले. फ्लाईट कॅप्टन नम्रता म्हणाल्या, “डॉ. आंबेडकरांच्या मिशनमध्ये सहभागी असलेले प्रवासी आमच्या फ्लाइटमध्ये आहेत, हा आमच्यासाठी गौरवाचा क्षण आहे. आम्ही बाबासाहेबांचा मनापासून सन्मान करतो असेही त्या म्हणाल्या.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!