अमित शहा यांच्या विरोधात जनआक्रोश मोर्चा
मुंबई : विजय आबाजी लांडगे (पत्रकार)
Advertisement
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल संसद भवन येथे देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अपमान जनक शब्द वापरले. त्यामुळे त्यांच्या विरोधात हनुमान नगर यलो गेट ते वडारी पाडा पर्यंतनिषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चा मध्ये अमीत शहा यांची प्रेतयात्रा काढण्यात आली. त्या नंतर हा मोर्चा समता नगर पोलीस चौकी या ठिकाणी दाखल झाला. अमित शहा यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात यावा यासाठी निवेदन देण्यात आले यावेळी सर्व समाज बांधवांच्या वतीने आंदोलनं करण्यात आले . यावेळी सर्व पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





