संजय राऊतांचा मोदींवर घणाघात


लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा राज्यात पार पडला आहे. पाचव्या टप्प्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. पाचव्या टप्प्यात सुरू असलेल्या मतदानासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या रस्त्यांवर रोड शो करणार आहेत. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे.

पंतप्रधान मुंबईमध्ये येणार असून त्यांचा रोड शो देखील होणार आहे. यामुळे संजय राऊत यांनी शेवटी मोदींना रस्त्यावर आणलं गेलं, असा टोला लगावला आहे. त्यानंतर त्यांनी आसामच्या जागेवर भाष्य केलं आहे. यंदा आसाममध्ये भाजपची एकही जागा येणार नाही, असं तिथले मुख्यमंत्रीच म्हणत होते. काशीचा निर्णय तिथली जनता घेईल. हेमा मालिनी हरणार आहेत, असं भाकीत संजय राऊत यांनी केलं आहे.

Advertisement

मुंबईतल्या पंतप्रधानांच्या रोडशोवरील प्रश्नावर संजय राऊत यांनी खोचक उत्तर दिलं ते म्हणाले की, ‘पंतप्रधान मोदी मगरीचे अश्रू ढाळणारे, नौटंकी करणारे व्यक्ती आहेत’, असं उत्तर देत खोचक टोला लगावला आहे. त्यांनी मुंबईच्या सहा जागांवर भाष्य केलं. महाविकास आघाडी मुंबईमध्ये सहा जागा लढवत आहेत. यामुळे सहाही जागा महाविकास आघाडी जिंकणार असल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत.

मोदींना मुंबईमध्ये दररोज ठाण मांडून बसावं लागत आहे. तुमच्यावर दररोज भटकण्याची ही वेळ का आली आहे. हे लोकंना कळू द्या, असं संजय राऊत म्हणाले आहेत. मोदी देशभरात रोडशो करत आहेत. त्यांना काही काम नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. मोदी हे मणीपूरला गेले नाहीत, का? काश्मिरी पंडीतांचे अश्रू पुसायला गेले नाहीत. मोदी मुंबईत, महाराष्ट्रात जिथं जातील तिथं पराभव निश्चित असल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत.

“महाराष्ट्रातील जनतेने निर्णय घेतलाय. उमेदवार कोणी असो, मोदी नको. मोदी गो बॅक ही गावागावातील घोषणा आहे”, असं संजय राऊत म्हणाले. जिथे निवडणुका झाल्यात तिथे महाविकास आघाडी ९० टक्के जागा जिंकणार असल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!