परभणी येथे पोलीसांकडून अटक केलेल्या वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाच्या मृत्यूच्या निषेधार्थ कांदिवलीत बंदचे पडसाद…!!
मुंबई : विजय उत्तमबाई कांबळे
परभणी येथील संविधान प्रतिमेचे विटंबना त्याच्या निषेधार्थ काढलेल्या मोर्च्यात काही माथेफिरूंनी त्या आंदोलनात घुसून तोडफोड केली. त्याच्या नंतर परभणी पोलिसांनी कोम्बिंग ऑपेरेशनच्या नावाखाली पुण्यावरून वकिलीच्या परीक्षेसाठी परभणीत आलेल्या सोमनाथला घरातून अटक केली आणि त्या अटकेनंतर काल त्या बांधवाचे निधन झाले असे घरच्यांना कळवण्यात आले.
पण हा संशयित मृत्यू आहे म्हणून काल “आनंदराज आंबेडकर” यांनी संविधान प्रेमी जनतेला आज महाराष्ट्र बंद करण्याचे आव्हान केले. समाजाने सुद्धा या आव्हानाला मान्य करत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बंद पाळण्यात आला.
मुंबईतील कांदिवली पूर्वेतील दामू नगर, हनुमान नगर या ठिकाणी सुद्धा बंदला चांगला प्रतिसाद मिळाला.
क्रांती नगर येथील “रमाबाई चौक येथून बंदला सुरुवात करत “डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन” क्रांती नगर येथे सर्व संविधान प्रेमी हे एकत्र आले. “बाबासाहेब आंबेडकर” यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून आणि “शहीद सोमनाथ सूर्यवंशी” यांना अभिवादन करून संपूर्ण क्रांती नगर, गोकुळ नगर, दुर्गा नगर, आप्पा पाडा बंद करण्यात आले. या बंदच्या मोर्च्याचा शेवट हा आप्पा पाडा येथील “कुलवाडी भूषण बहुजन प्रतिपालक जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज” यांना पुष्पहार घालून यांना अभिवादन करून करण्यात आले…!!
क्रांती नगर मधील महिलांनी सुद्धा “शहिद सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी” याच्या संशयित हत्तेमुळे आपला जास्तीत जास्त सहभाग दाखवत एकत्र येत उत्स्फूर्तपणे या बंदला प्रतिसाद दिला. महिलांना विचारलं असता तुम्ही का बंद करताय तर त्या बोलतात तो एका आईचा मुलगा परभणी पोलिसांनी मारून टाकलाय याचा राग त्यांना घरात बसू देत नव्हता. त्या सोमनाथच्या आईवर कोसळलेल्या दुःखाचे आम्ही सांत्वन करायला परभणीला जावू शकत नाही. म्हणून त्याच्या हत्तेच्या निषेधार्थ क्रांती नगर मधील मायमाऊल्या या परभणी पोलिसांचा निषेध करायला आणि “शहिद सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी” या बांधवाला क्रांतिकारी अभिवादन करायला म्हणून बंद करत आहोत असं मत जाहीर केलं. कुरार पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी सुद्धा आंदोलकांना सहकार्य केले.
“या पुढेही असेच एकत्र राहूया आणि समाज कंटकांविरुद्ध
लढत राहूया…!!
अशी घोषणा देऊन आजच्या कांदिवलीतील बंदचे आंदोलन यशस्वी करण्यात आले.





