क्रांती नगर चे ऍड. दीपक जगदेव यांच्यामुळे शहापूर येथील पीडित महिलेला न्याय मिळण्यास मदत
शहापूर या ठिकाणी दलित महिलेवर होत असलेल्या लैंगिक अत्याचार आणि घरेलू हिंसाचारा विरुद्ध तक्रार नोंदवून न घेणाऱ्या शहापूर पोलिसांना ऍड. दीपक जगदेव यांनी पीडित महिलेची तक्रार नोंदवून घेण्यास भाग पाडले.
पीडित महिला ही शहापूर येथे वास्तव्यास असून पति, दोन मुले आणि सासू सासरे यांच्या सोबत राहत आहे. पीडित महिलेचा पतिचे नाव नितीन गोडामे असून तो एका खाजगी कंपनी मध्ये सिक्युरिटी गार्ड ची नोकरी करतो. याच कंपनीमध्ये काम करीत असलेल्या रोहिणी संजय थोरवे नावाच्या महिलेशी त्याचे प्रेमसंबंध होते. त्यानंतर रोहिणी आणि पीडित महिलेचा पति हे दोघे मिळून पीडित महिलेला घरात घुसून मारहाण करीत होते. तसेच रोहिणी पीडित महिलेच्या सासू सासरयांना पैसे देत असल्यामुळे ते देखील त्यांचीच बाजू घेत असत आणि पीडित महिलेला मारहाण आणि अश्लील शिवीगाळ करत असत.
रोहिणी ही पीडित महिलेला पन्नास हजार रुपये घे आणि तुझ्या घरी जाऊन रहा असे सांगत असे. काही कारणास्तव पीडित महिला रोहिणी च्या घरी तिच्या पती (नितीन) ला आपल्या तेरा वर्षाच्या मुलास घेऊन भेटावयास गेली असता त्या दोघांनीही पीडित महिलेच्या प्रायव्हेट पार्टवर मारहाण केली. तसेच तिच्या तोंडात कापसाचा बोळा कोंबून त्यांच्या समोर सेक्स देखील केला.
सदरची तक्रार शहापूर पोलीस स्टेशन येथे गेली असता पोलिसांनी आरोपींना मदत करून पीडित महिलेला हाकलून दिले.अनेक वेळा तक्रार देऊन सुद्धा कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही.
सदर पीडित महिलेचे प्रकरण हे यश शिंदे यांच्या मार्फत ऍड. दीपक जगदेव आणि ऍड. नितीन सातपुते यांच्याकडे आली असता त्यांनी या प्रकरणाची चौकशी करून शहापूर पोलिसांना पीडित महिलेची तक्रार नोंदवून घेण्यास भाग पाडले. सदर घटनेत पोलिसांनी एकंदरीत २५ कलमे लावून आरोपींना तात्काळ अटक केली आणि पुढील तपास चालू आहे.





