कांदिवलीच्या पायोनियर शाळेत “Understanding Children’s Mental Health” वर्कशॉप चे आयोजन
मुंबई कांदिवली पूर्व या ठिकाणी असलेल्या M.L.R.T Gala Pioneer School मधे आज दिनांक २४ ऑगस्ट रोजी पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी “Understanding Children’s Mental Health” या वर्कशॉप चे आयोजन रोटरी क्लब लोखंडवाला कांदिवली आणि आदित्य बिर्ला एजुकेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
या वर्कशॉपचे आयोजन हे लहान मुलांच्या मानसिक स्वास्थ्याशी निगडित असलेल्या समस्यांवर प्रकाश टाकण्यासाठी करण्यात आले होते. यावेळी आदित्य बिर्ला एजुकेशन ट्रस्ट च्या काउंसलर कृति शाह यांनी मानसिक स्वास्थ्य शी निगडित असलेल्या बऱ्याच प्रश्नांवर कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व शिक्षकवृंद आणि पालकांशी चर्चा केली.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद आणि कर्मचारी वर्ग आणि पालक वर्ग ही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब लोखंडवाला कांदिवली च्या अध्यक्षा प्रिया शिनॉय, डॉ. अम्बुजन अय्यर, श्रीमती. अनु श्रीवास्तव आणि वरिष्ठ सदस्य श्री. अरुण काळे उपस्थित होते.





