गार्डने कंगनाच्या कानशिलात लगावली
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अभिनेत्री कंगना राणौत मंडी लोकसभा मतदारसंघातून विजयी झाली आहे. सध्या कंगना ही अनेक कारणाने चर्चेत आली आहे. अभिनेत्री आता भाजपची नवनिर्वाचित खासदार झाली आहे. मात्र आता कंगनाबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. चंदीगडहून कंगना दिल्लीला रवाना व्हायला निघाली होती. तेव्हा एका सिक्युरिटी गार्डने कंगनाच्या कानशीलात लगावली असल्याची माहिती समोर आली आहे.
कंगना राणौतने शेतकरी आंदोलनाविरोधात वक्तव्य केलं होतं. यामुळे सीआयएसएफ गार्ड कुलविंदर कौर हिने कंगनाची कानशिलात लागवल्याची माहिती समोर आली आहे. कंगनाने कानशिलात लगावणाऱ्या महिला कॉन्स्टेबलच्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
कंगना चंदीगडहून दिल्लीला निघाली होती. सीआयएसएफच्या महिला सेक्युरिटी गार्डने तपासणीदरम्यान ही घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी कंगनासोबत असलेल्या मयंक मधुरने कुलविंदर कौरला थोबाडीत मारण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेबाबत कंगनाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. ती विमानाने दिल्लीला रवाना झाली. तिचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
मंडी लोकसभा मतदारसंघातून कंगना राणौतला भाजपने उमेदवारी दिली होती. कंगनाला उमेदवारी दिल्यानंतर एक नवा वाद निर्माण झाला होता. काँग्रेसच्या एका नेत्याने कंगानाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. तेव्हापासून कंगनाची चर्चा होताना दिसत आहे. अखेर कंगनाचा विजय झाला.





