“दादांना सांगा ताई आल्या, वहिणींना सांगा ताई आल्या”
बारामती लोकसभा मतदारसंघात पवार विरूद्ध पवार अशी लढत पाहायला मिळाली. अनेकांचं लक्ष हे बारामती लोकसभा मतदारसंघाकडे लागलं होतं. शरद पवारांनी बारामतीप्रमाणे इतर मतदारसंंघात सभा घेतल्या. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी आपला बारामती बालेकिल्ला राखत विजय मिळवला आहे. अशातच आता सुप्रिया सुळे यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी करत अजित पवारांना डिवचलं आहे.
पुण्यात गुलाल उधळूण सुप्रिया सुळे यांच्या समर्थकांनी दादा आणि वहिणींना डिवचलं आहे. अजितदादा हे पुण्याचे पालकमंत्री आहेत. मात्र त्याच पुण्यात सुप्रिया सुळेंच्या समर्थकांनी ‘दादांना सांगा ताई आल्या, वहिणींना सांगा ताई आल्या’, अशा घोषणा दिल्या असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान सुप्रिया सुळे यांच्या चेहऱ्यावर विजयाचा आनंद दिसून येत असल्याचं पाहायला मिळत आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात पवार कुटुंबातील उमेदवार पवारांसमोर उभा होता. यामुळे बारामतीकर जनता संभ्रम अवस्थेत पाहायला मिळाली होती. मात्र अंतिम टप्प्यात म्हणजे मतदानादिवशी बारामतीकरांनी कौल सुुप्रिया सुऴेंना दिला असल्याचं स्पष्ट झालं. सुप्रिया सुळे यांचा तब्बल १ लाख ५३ हजार ९६० मतांनी विजयी झाल्या. याची जोरदार चर्चा होताना दिसतेय.
पुणे शहरात आता सुप्रिया सुळे यांच्यावर जेसबीने गुलाल तसेच फुलांची उधळण होताना दिसत आहे. दरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघात पुणे शहरातील खडकवासला देखील मतदारसंघ येतो. मात्र खडकवासला मतदारसंघ हा भाजपचा मतदारसंघ असल्याचं दिसून आलं आहे. या मतदारसंघातून सुनेत्रा पवार या २१ हजार मतांनी घाडीवर होत्या. तसेच या मतदारसंघातून यंदा दरवर्षीच्या तुलनेत कमी मतदान झाल्याचं पाहायला मिळाले.
बारामती मिळवता येईल यासाठी महायुतीने पवार कुटुंबाच्या घरातीलच नेता पवार कुटुंबाविरोधात लढण्यासाठी दिला होता. याचा फायदा महायुतीला होईल अशी आशा होती, मात्र तसं झालं नाही. शेवटी बारामतीकरांनी मोठ्या साहेबांना साथ दिली.





