नरेंद्र मोदींचा राजीनामा


लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रात भाजपला चांगलाच धक्का बसल्यामुळे सगळीकडे एकच चर्चा रंगली. भाजपने ४०० पारचा नारा दिला मात्र भाजपचं हे स्वप्न भंगल आहे.

नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपतीं द्रोपर्दी मुर्मु यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. ७ जूनला भाजपच्या संसदीय पक्षासह एनडीएची बैठक होणार आहे. या बैठकीत मोदींनाच नेता म्हणून निवडण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. संसद भवनात या दोन्ही बैठका होणार असून मोदी सरकारचा शपथविधी ८ जूनला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Advertisement

भाजप नेते नवीन सरकार स्थापन करण्यासाठी तयारीला लागतील असं म्हटलं जात आहे. राष्ट्रपती सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला बहुमत स्थापन करण्यासाठी बोलवतील त्यानंतर बुहमत चाचणी घेतली जाईल असं म्हटलं जात आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान मोदींचा राजीनामा मंजूर केला असून मोदी आतापासून काळजीवाहू पंतप्रधान म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.

नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा येत्या ८ जूनला होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नरेंद्र मोदी सत्ता स्थापनेसाठी दावा करण्याची शक्यता आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!