किंग ऑफ एशिया


मुकेश अंबानी यांना मागे टाकून उद्योगपती गौतम अदानी आता भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. इतकेच नाही तर गौतम अदानी यांनी जगातील अब्जाधीशांच्या यादीत मोठी झेप घेतली आहे.

ब्लूमबर्ग बिलिनिअर्स निर्देशकांनुसार मुकेश अंबानी श्रीमंतांच्या यादीत १०९ अब्ज डॉलरसह १२ व्या क्रमांकावर आहेत. ते आशियातील दुसरे श्रीमंत व्यक्ती ठरले. शुक्रवारी अदानी यांच्या संपत्तीत मोठी भर पडली.

या वर्षात त्यांच्या संपत्तीत २६.८अब्ज डॉलर म्हणजे २२३६१३,१७,००,००० रुपयांची तेजी आली. हिडनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअरमध्ये भूकंप आला होता. पण आता मोठी भरपाई झाली आहे.

अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर गौतम अदानी यांच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळं कंपनीचे मूल्य वाढत आहे. अशा परिस्थितीत गौतम अदानी यांच्या संपत्तीतही वाढ झाली आहे.

Advertisement

अदान इंटरप्राईजेसमध्ये सात टक्क्यांची तेजी आली, हा शेअर ३४१६.७५ रुपयांवर बंद झाला. अदानी पोर्टस शेअरमध्ये ४ टक्क्यांची वृद्धी आली. हा शेअर १४४० रुपयांवर बंद झाला. अदानी पॉवर, व्यापारी सत्रात १४ टक्के तेजीत होता. हा शेअर ७५९.८० रुपयांवर बंद झाला. तर अदानी टोटल गॅसमध्ये ९ टक्क्यांची तेजी दिसली.

अमेरिकेच्या मायकल डेल यांच्या संपत्तीत शुक्रवारी सर्वाधिक घसरण झाली. डेल यांनी एका फटक्यात ११.७ अब्ज डॉलर गमावले. ते श्रीमंतांच्या यादीत ११ व्या क्रमांकावरुन १३ व्या क्रमांकावर फेकले गेले. फ्रान्सचे अब्जाधीश बर्नार्ड अरनॉल्ट हे श्रीमंतांच्या यादीत २०७ अब्ज डॉलरसह पहिल्या क्रमांकावर आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!