१२ वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या १२ वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे.
यंदाच्या वर्षीही राज्यात मुलींनीच बाजी मारली असून विज्ञान शाखेचा सर्वोत्तम निकाल लागला आहे. यावेळी ९५.४४ टक्के विद्यार्थिनी तर ९१.६० टक्के पुरुष विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
Advertisement
शाखानिहाय गुणांची टक्केवारी खालीलप्रमाणे आहे.
विज्ञान शाखा – ९७.८२ टक्के
कला शाखा – ८५.८८ टक्के
वाणिज्य शाखा – ९२.१८ टक्के
व्यावसायिक शाखा – ८७.७५ टक्के
ITI शाखा – ८७.६९ टक्के





