अभिनेत्री ईशा देओलची नव्या इनिंगला सुरुवात


अभिनेत्री हेमा मालिनी आणि अभिनेते धर्मेंद्र यांची लाडकी लेक ईशा देओल आणि भरत तख्तानी यांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेऊन घटस्फोट घेतला आहे. आम्ही आता जरी एकत्र नसलो तरी आमच्या दोन मुलांचं भविष्य आमच्यासाठी महत्वाचं आहे असे म्हणत ईशा आणि भरत वेगळे झाले.

घटस्फोटानंतर ईशा दोन्ही मुलींचा ‘सिंगल मदर’  म्हणून सांभाळ करत आहे. अशातच ईशाने एका कार्यक्रमात बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे. घटस्फोट झाल्यानंतर ईशाने पुन्हा नव्याने आपल्या आयुष्याची सुरुवात केली आहे.

नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमामध्ये ईशा म्हणाली की, ‘मी सध्या माझ्या आगामी सिनेमांच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. सिनेमांची घोषणा लवकरच करण्यात येईल. मी आता खूप आनंदी आहे… सध्या एवढंच सांगेन …’, असं ईशा म्हणाली. तिच्या या विधानातून ती पुन्हा फिल्म इंडस्ट्रीमध्ये कमबॅक करणार असल्याची चर्चा आहे.

Advertisement

ईशाने एका वृक्षारोपण मोहीमेत हजेरी लावली होती. ‘झाडे लावणे ही एक अद्भुत भावना आहे कारण ती आपल्यासाठी नाही तर आपल्या भावी पिढ्यांसाठी आहे. नुकताच, आम्ही मुंबईत भयानक वादळ पाहिलं. यापूर्वी दुबईला मुसळधार पावसामुळे पुराचा सामना करावा लागला होता. हे सर्व निसर्गाचे सौंदर्य जपण्यासाठी दिलेले आव्हान आहे. असं ती म्हणाली.

ईशाने बॉलिवूडनंतर ओटीटीवर पदार्पण केलं आहे. अभिनेता सुनील शेट्टी याच्यासोबत ती ‘हंटर टूटेगा नही तोडेगा’ या सीरिजमध्ये दिसून आली होती. २००२ मध्ये ‘कोई मेरे दिल से पूछे’ या रोमँटिक सिनेमाद्वारे ईशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या सिनेमात तिच्यासोबत आफताब शिवदासानी दिसला होता.

ईशाने ‘ना तुम जानो ना हम’, ‘क्या दिल ने कहा’, ‘कुछ तो है’, ‘दस’, ‘नो एंट्री’, ‘शादी नंबर 1’ यांसारख्या अनेक चित्रपटांमधे काम केलं आहे. आता ती पुन्हा सिनेसृष्टीमधे कमबॅक करणार असल्याची जोरदार चर्चा आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!