आज बारावीचा निकाल
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीचा निकाल आज दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे. त्यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांसह पालकांची धाकधूक वाढली आहे. बारावीच्या परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आज संपणार आहे.
विद्यार्थ्यांना निकाल अधिकृत वेबसाईटवर पाहावा लागणार आहे. म्हणजेच mahahsscboard.in आणि mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन विद्यार्थी त्यांचे निकाल पाहून व डाउनलोड करू शकतील. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल तपासण्यासाठी नोंदणी क्रमांक किंवा रोल नंबर टाकावा लागेल.
याशिवाय विद्यार्थी त्यांचा निकाल https://mahahsscboard.in/mr या लिंकद्वारे देखील पाहू शकतील. उच्च माध्यमिक म्हणजेच बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्च या कालावधीत घेण्यात आली होती.
गेल्या वर्षी दहावीच्या दहावीच्या परीक्षेच्या निकालात एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी घसरली होती. जेथे 2023 मध्ये उत्तीर्णतेची टक्केवारी ९३.८३ इतकी नोंदवली गेली होती. तर २०२२ मध्ये हे प्रमाण ९६.९४ टक्के होते. गेल्या वर्षी बारावीच्या महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्णतेची टक्केवारी ९१.२५ होती. २०२२ मध्ये ही घट ९४.२२ टक्के होती. गतवर्षी विज्ञान शाखेचे विद्यार्थी ९६.०९ टक्के, तर वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९०.४२ टक्के होते. तर कला शाखेत हे प्रमाण ८४.०५ टक्के होते.
खाली दिलेल्या साईटवर आपण बारावीचा निकाल पाहू शकता.
mahahsscboard.maharashtra.gov.in
mahresult.nic.in
hscresult.mkcl.org
mahahsc.in
mahahsscboard.इन





