प्रसिद्ध अभिनेत्री पवित्रा जयरामचे कार अपघातात निधन
प्रसिद्ध अभिनेत्री पवित्रा जयरामचे यांचे कार अपघातात निधन झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हैदराबादच्या मेहबूब नगरजवळ हा अपघात झाला आहे. पवित्राची कार बसला धडकल्याने हा अपघात झाल्याचे वृत्त आहे. हा अपघात इतक भीषण होता की अभिनेत्रीचा जागीच मृत्यू झाला. पवित्रा यांच्या निधनाची बातमी कळताच कुटुंबासह फिल्म इंडस्ट्रीत देखील शोककळा पसरली आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, लोकप्रिय तेलुगू व कन्नड टीव्ही अभिनेत्री पवित्रा जयरामचे रविवारी कार अपघातात निधन झाले आहे. पवित्राच्या कारला बसने धडक दिली आहे. हा अपघात हैदराबादमध्ये झाल्याने तिथेच तिचा मृत्यू झाला आहे. अभिनेत्री पवित्रा तिची बहीण अपेक्षा, ड्रायव्हर श्रीकांत आणि अभिनेता चंद्रकांत यांच्यासह कारने प्रवास करत होते.
अभिनेत्रीच्या कारच्या ड्रायव्हरचं नियंत्रण सुटलं आणि कार दुभाजकाला धडकल्याची माहिती समोर येत आहे. कार दुभाजकाला धडकल्यानंतर एका बसने या कारला धडक दिली. या भीषण अपघातात अभिनेत्री पवित्राचा जागीच मृत्यू झाला तर तिच्याबरोबर असलेले इतर सर्वजण गंभीर जखमी आहेत. त्या सर्वांना खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आलं आहे. तसेच त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
अभिनेत्री पवित्रा ही ‘त्रिनयनी’ या शोमुळे प्रसिद्धी झोतात आली होती. मात्र अभिनेत्रीच्या मृत्यूच्या बातमीने टीव्ही इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. पवित्रा जयरामचे सोशल मीडियावर प्रचंड चाहते आहेत. तिच्या अचानक झालेल्या अपघाती मृत्यूने चाहत्यांना मोठा धक्काच बसला आहे. अभिनेत्रीच्या निधनाने कन्नड इंडस्ट्रीतील कलाकार देखील शोक व्यक्त करत आहेत.





