लिटिल चॅम्प कार्तिकी गायकवाडच्या घरी गोंडस पाहुण्याचे आगमन
लिटिल चॅम्प कार्तिकी गायकवाडच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कार्तिकीने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. कार्तिकीचा पती रोनित पिसे या दोघांनी आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे आणि त्यांनी याबाबत आनंदाची बातमी दिली आहे.
शास्त्रीय संगीतासाठी कार्तिकी गायकवाडची ओळख आहे. तिने लिटिल चॅम्प या कार्यक्रमात भाग घेऊन स्पर्धेच्या अंतिम टप्प्यापर्यंत झुंज दिली होती. यावेळी कार्तिकी गायकवाडचं घागर घेऊन घागर घेऊन… हे गाणं त्यावेळी मोठ्या प्रमाणात गाजलं होतं. त्या गाण्याची आजही क्रेझ आहे.
कार्तिकीचा पती रोनित पिसे हा पुणे स्थित व्यवसायिक आहे. दोघांचा सुखाचा संसार सुरू आहे. या संसारामध्ये एका चिमुकल्याचं आगमन झालं आहे. यामुळे आता कार्तिकी आणि रोनित पिसे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. याबाबत दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट करून आपल्या चाहत्यांना याबाबतची माहिती दिली आहे.
२०२० मध्ये रोनित पिसे आणि कार्तिकी गायकवाड यांनी एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली. कार्तिकी आई झाल्याच्या बातमीने संगीत विश्वात आनंदाची झुळूक पाहायला मिळत आहे. अनेकजण दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत. दोन महिन्यांआधी कार्तिकीचे डोहाळ जेवणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
कार्तिकीच्या गोंडस बाळाला कधी पाहता येईल याकडे कार्तिकीच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. यामध्ये कार्तिकीने आपल्या लहान बाळाचे बोट धरल्याचं पाहायला मिळत आहे.





