नूडल्स खाणे जीवावर बेतलं
भारतामध्ये चायनिज या खाद्य प्रकारची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यात विविध खाद्यपदार्थांचं मिश्रण असतं. मात्र त्याच मिश्रणामुळे चायनिज खाताना जीभेला चविचा चटका लागतो. तुम्ही जर चायनीज खात असाल तर तुम्ही हे खाणं बंद केलं पाहिजे. कारण काही दिवसांआधी मुंबईत शोरमा खाणं एका मुलाला महागात पडलं आहे. अशीच एक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. चायनीज प्रकारातील नुडल्स खाणं हे या मुलाच्या जीवावर बेतलं आहे.
उत्तर प्रदेशातील पिलीभीत या ठिकाणी एका कुटुंबियांनी राईस आणि नुडल्स खाल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे त्यांना दुसऱ्या दिवशी उलट्या, जुलाब होऊ लागल्या. चांदिया हजारा गावातील रूग्णालयात या रूग्णांना दाखल करण्यात आलं. दिवसभर उपचार केल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं. मात्र घरी गेल्या नंतरही त्यांना पुन्हा एकदा त्रास सुरू झाला.
शुक्रवारी उलट्या आणि जुलाब झाल्याचे कुटुंबातील सदस्याने सांगितलं. त्यामुळे अनेकांना विषबाधा झाली असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. यामध्ये सुरूवातीला कुटुंबातील एकाचा विषबाधेने मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
उपचार सुरू असताना शनिवारी इतर पाच जणांना सीएचसीमध्ये नेण्यात आलं होतं. तिथं प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी विषबाधा झाल्याचं सांगितलं. ही विषबाधा कशी होते याबाबत आपण जाणून घेऊया.
अन्नातही अशुद्धता असते. अनेकदा अन्नातील अशुद्धता ही जेवणात मिसळली गेल्याने विषबाधा होते. दोन वेगवेगळ्या गुणधर्माचे पदार्थांचे सेवन केल्याने विषबाधा होते. अनेकदा बराच वेळ ठेवलेल्या अन्नामध्ये देखील विष पसरलं जातं. त्यामुळे विषबाधा होण्याची समस्या निर्माण होते. यामुळे चायनीज पदार्थांचे अतिसेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.





