कांदिवलीच्या पोईसरमधे सार्वजनिक ठिकाणच्या अनाधिकृत अतिक्रमणावर पालिकेची तोडक कारवाई…!!


मुंबई :

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ने कांदिवली पश्चिम येथील पोईसर परिसरातील सार्वजनिक ठिकाणी अनाधिकृतपणे बनविल्या गेलेल्या दुकान आणि रेस्टोरेंट वर कडक कारवाई केली. ज्यामुळे स्थानीय व्यापारयांमधे संतापाची लाट आहे. महानगरपालिकेच्या अनुसार हे दुकानदार आणि रेस्टोरेंट चे मालक कोणत्याही कायदेशीर परवानगी शिवाय सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण करुन आपली दुकाने थाटल्यामुळे नागरिकांना रहदारी करण्यास प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. नागरिकांच्या सततच्या येणाऱ्या तक्रारींमुळे महानगरपालिकेने सर्वांचे निरीक्षण केल्यानंतर आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई केली. कारवाई करण्याअगोदर पालिकेने त्यांना कायदेशीर नोटिस देखील दिली होती. यामधे त्यांना जागा रिकामी करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

Advertisement

बुलडोजर च्या सहाय्याने अतिक्रमण करण्यात आलेल्या दुकानांवर कारवाई करून त्यांना जमीनदोस्त करण्यात आले. या कारवाईचा उद्देश नागरिकांना होणारा त्रास दूर करून अतिक्रमण करण्यात आलेल्या जागा मुक्त करने हा होता. यासंदर्भात व्यापारयांमधे प्रचंड असंतोष होता. त्यांचे म्हणणे असे होते की, आम्ही एवढ्या वर्षा पासून येथे व्यवसाय करतो त्यामुळे पालिकेने आम्हाला पर्यायी जागा उपलब्ध करून द्यायला हवी होती.

त्यानंतर अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई ही चालूच राहणार आणि ही कारवाई फक्त पोईसर विभागा पुरतीच मर्यादित न राहता मुंबईतील अन्य विभागात देखील सुरुच राहणार असल्याचे संकेत पालिका अधिकाऱ्यांनी दिले. सदरची कारवाई करत असतेवेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांची मदत घेण्यात आली होती.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!