“निर्भीड समाचार” तर्फे क्रांती नगर रिक्शा स्टँड येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन..!!
मुंबई : आज दिनांक २८ नोव्हेंबर २०२५ रोजी “Mumbai Districts AIDS Control Society” आणि “गौरव” या सामाजिक संस्था (NGO) यांच्या संयुक्त विद्यमाने आणि “निर्भीड समाचार” यांच्या पुढाकाराने क्रांती नगर रिक्शा स्टैंड येथे नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागरिकांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या तपासणी शिबिराचा मुख्य उद्देश हा HIV पॉजिटिव निघालेल्या रुग्णांना महानगर पालिकेच्या दवाखान्यामधे जाऊन योग्य उपचार कसे घ्यावे याविषयी मार्गदर्शन करतात. मुंबई मधे बऱ्याच ठिकाणी या संस्थेद्वारे अशा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येते असे या संस्थेचे प्रोग्राम मॅनेजर निमेश गोरड यांनी सांगितले.

सदर शिबिरावेळी गौरव संस्थेचे डॉ. विजय पासी, आरोग्य कर्मचारी रिषिकेश, अंकित, विश्वास, आणि समीर शेख उपस्थित होते.
“निर्भीड समाचार” च्या वतीने सर्व अधिकार्ऱ्यांचे मनःपूर्वक आभार..!!




