Macleods Pharmaceutical Ltd. चे संस्थापक डॉ. राजेंद्र अग्रवाल यांची उद्या प्रार्थना सभा..!!
मुंबई : Macleods Pharmaceutical Ltd. कंपनीचे संस्थापक डॉ. राजेंद्र अग्रवाल यांच्या पार्थिवावर आज जुहू येथील त्यांच्या राहत्या घरापासून विलेपार्ले येथील स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात आले. हजारोंच्या संख्येने जमलेल्या जनसमुदायाच्या उपस्थितित साश्रु नयनांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. उद्या सायंकाळी ४ ते ७ वाजेपर्यंत वृंदावन हॉल, पहिला मजला, इस्कॉन मंदिर, जुहू या ठिकाणी त्यांची प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली आहे.
Advertisement






