दहीहंडी च्या सरावास प्रारंभ
यावर्षीच्या दहीहंडी च्या सराव शिबिरास सुरुवात झाली आहे. दहीहंडी चा उत्सव देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अनेक पथके ऊँचच ऊंच थर लावून हंडी फोडन्याचा विक्रम करतात. प्रत्येक वर्षी नवनवीन दहीहंडी पथकांची स्थापना होते.
अशातच दुर्गा नगर, कांदिवली पूर्व येथील नवीनच उदयाला आलेले बाल गोपालांचे पथक म्हणजेच जय श्री महाकाल गोविंदा पथक.
या बाल गोविंदांचा सराव हा खुपच कौतुकास्पद आहे. नवीन असून देखील सराव करत असताना त्यांनी पाच थर लावण्याचा देखील विक्रम केला. रात्री च्या वेळेस सर्व कामे आटोपुन नित्य नेमाने त्यांचा हा सराव सुरु आहे.
या गोविंदा पथकाचे मार्गदर्शक आणि अध्यक्ष श्री. रणजीत हे बाल गोपालांकडून अतिशय उत्तमरित्या सराव आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन करताना दिसून येतात. परिसरातील अनेक मान्यवरांनी त्यांच्या या सराव शिबिरास शुभेच्छा दिल्या आहेत.





