‘सरस्वती विद्यालय’ कांदिवली पूर्व येथील शिक्षकाला ‘तिसऱ्या अपत्यामुळे’ बडतर्फ करण्याची मागणी..!!
मुंबई : लहान कुटुंब २००५ च्या कायद्यानुसार बृहन्मुंबई पश्चिम विभागाअंतर्गत कांदिवली पूर्व येथे स्थित असलेल्या सरस्वती विद्यालयातील शिक्षक जयसिंग कदम यांच्यावर नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शालेय शिक्षण मंत्री यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. सरस्वती विद्यालय, कांदिवली पूर्व या शाळेच्या मुख्याध्यापक पदावर रुजू असताना कोर्टाच्या आदेशाने कदम यांचे मुख्याध्यापक पद काढून घेण्यात आले. कदम यांनी तिसरे अपत्य जन्माला घातल्यामुळे लहान कुटुंब नियोजन २००५ या कायद्याचे उल्लंघन झाल्याचे लेखी तक्रार दाखल करूनही शिक्षण विभाग कोणत्याही प्रकारची कारवाई करत नसल्याचा आरोप सुचित कांबळे यांनी केला आहे.

कदम यांच्या गैरवर्तनाप्रकरणी शाळा प्रशासनाने चौकशी समिती नेमून त्यांची सेवा सन २०१९ ला समाप्त केली होती. कदम यांची देयके कोर्टाच्या आदेशाचा अवमान करून काढली जात असून शिक्षण निरीक्षक कार्यालयाकडून शासनाच्या निधीचा अपहार होत असल्याचा आरोप कांबळे यांनी केला आहे.




